top of page

"माझी कला माझे स्वातंत्र्य " कार्यक्रमात कवयित्री शिद्दत व संगीतकार हिमांशू पोतदार ह्यांची हजेरी


चंद्रकोर प्रस्तुत "उभारी नाविन्याला" या फाउंडेशन च्या अंतर्गत 'माझी कला, माझे स्वातंत्र्य' या विषयावर 30 मे रोजी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून लेखिका व कवयित्री शिद्दत व गायक आणि संगीतकार हिमांशू पोतदार यांनी हजेरी लावली या कार्यक्रमाचे निवेदन होस्ट तसेच Diamond Honeycomb Films चे प्रमुख चंद्रकांत हिरे यांनी केले.



या कार्यक्रमांतर्गत हिमांशू पोतदार यांनी फ्युजन या संगीत प्रकारात बद्दल विशेष माहिती सांगितली.



मराठी साहित्य, मराठी साहित्याचे प्रकार

यावर लेखिका व कवयित्री शिद्दत यांनी खास टिपण्णी केली आणि एवढेच नव्हे तर कुमार विश्वास सारख्या मान्यवर लोकांचे उदाहरण देत अनेक गोष्टींवर विशेष विश्लेषण लेखिका व कवयित्री शिद्दत यांनी दिले.


त्यानंतर गायक हिमांशू पोतदार यांनी संगीताचे वेगवेगळे पैलू या ठिकाणी उलगडवून दिले.

आणि स्वतःच्या आवाजातील स्वतः संगीतबद्ध केलेले गीत त्यांनी या कार्यक्रमात सादर केले.


"धुंदीतून " ह्या प्रचेतन पोतदार ह्यांनी लिहिलेल्या कवितेचे उत्तम चालीतून सादरीकरण करताना ,चंद्रमा ह्या स्वयं रचित गझले कडे त्यांनी लक्ष घेतले .


चंद्रकांत हिरे यांनी कार्यक्रमाचे आरास इतक्या सुंदर पद्धतीने आखली होती की त्यांनी समोर असलेल्या मान्यवरांनी देखील कौतुकाची दाद दिली


.

त्यांच्या एका प्रश्नाने श्रोत्यांची मने जिंकली की

संगीत आणि लेखन याठिकाणी उच्चार आणि भाषा शुद्ध असली पाहिजे असा अट्टाहास खूप वेळा पाहायला मिळतो, ह्या सगळ्यांमध्ये लोककला लोप पावली आहे का?

असा समग्र अभ्यास करून विचारला प्रश्न श्रोत्यांना खूप भावला. आणि या प्रश्नाचे तेवढेच योग्य ते दाखले देऊन लेखिका व कवयित्री शिद्दत यांनी त्यांचं मत व्यक्त केलं.


कार्यक्रमांतर्गत प्रेक्षकांचे प्रश्न आणि गाण्यांच्या फर्माईश यांकडे विशेष लक्ष निवेदक चंद्रकांत हिरे यांनी दिलं .


विशेष म्हणजे या कार्यक्रमात गोंधळ, भारुड तसेच पोवाडा या पारंपारिक लोक गीतांवर प्रश्न विचारण्यात आले त्याला मान्यवरांनी तितक्याच उस्फूर्त पद्धतीने अभ्यासू उत्तरे दिली

आणि सरतेशेवटी या कार्यक्रमाची सांगता एका सुंदर गाण्याने झाली ज्याची रचना कवयित्री शिद्दत ह्यांनी केली होती व संगीत स्वतः हिमांशू पोतदार ह्यांचे होते .


ह्या मुलाखती ला इतका प्रतिसाद मिळाला की प्रेक्षकांकडून अजून एका सत्राची मागणी होत आहे .


ही मुलाखत तुम्ही खालील दिलेल्या लिंक वर जाऊन पाहू शकता👇



bottom of page