top of page

वेलनेस्टाने D2C सेवेद्वारे मुंबईतील रहिवाशांसाठी सादर केली सुरक्षित आणि सोयीची वेलनेस सेवा

वेलनेस्टा ऍप या सलॉन व स्पा, जिम व फिटनेस, आयुर्वेदिक मसाज, योगा व नॅचरोपॅथी अशा पर्सनल वेलनेस सेवा सहजपणे शोधण्यास मदत करणाऱ्या भारतातील पहिल्या वेलनेस-टेक अॅपने सध्याच्या महामारीदरम्यान चांगली सेवा देण्याच्या हेतूने नुकतीच D2C सेवा सुरू केल्याची घोषणा केली आहे. वेबसाइट/ऍप मध्ये (अँड्रॉइड व iOS) फोटो व रिव्ह्यू यासह अनेक व्हेंडरची माहिती दिली आहे. युजरना हे व्हेंडर पाहता येतील, विश्लेषण करता येईल आणि त्यांच्या सोयीनुसार सेवा निवडता येईल. या सेवेमुळे युजरना त्यांच्या परिसरातील विविध आउटलेटमध्ये थेट अपॉइंटमेंट बुक करता येईल आणि सुरळित सेवेचा लाभ घेता येईल, तसेच आकर्षक सवलतीही मिळवता येतील.





वेलनेस्टाची D2C सेवा सध्या मुंबईभोवती केंद्रित असून तेथे आम्ही 500+ आउटलेटचा समावेश केला आहे व त्यातील 86 लाइव्ह झाले आहेत. बहुतेकसे व्हेंडर आकर्षक व काही वेळा 40% इतके अधिक डिस्काउंट देत असल्याने लोकांनी घराबाहेर पडायला आणि सेल्फ-केअर सेवांचा वापर करायला सुरुवात केली आहे.



“2020 हे वर्ष आमच्या कंपनीसाठी असंख्य बदलांचे आणि नवे धडे घेण्याचे होते”, असे वेलनेस्टाचे संस्थापक संजीव सिंघई यांनी नमूद केले. ते म्हणाले, “निर्बंध कमी व्हायला सुरुवात झाल्यापासून व्हेंडरच्या नोंदणीमध्ये वाढ झाली आहे. दररोज अधिकाधिक व्हेंडर आमच्याकडे नोंदणी करत आहेत आणि अॅपॉइंटमेंट, कुपन, इन्व्हेंटरी व पेरोल व्यवस्थापन सेवा देणाऱ्या आमच्या SaaS सेवेचा लाभ घेत आहेत. वेलनेस्टा ही सुविधा ग्राहकांना त्यांच्या परिसरातील विविध प्रकारची आउटलेट शोधण्याची सुविधा देते. कोविड-19 मुळे लोक सुरक्षा व स्वच्छता याविषयी कमालीचे जागरुक झाल्याने आम्ही त्यांच्यासाठी सुस्पष्ट फोटो व रिव्ह्यू देण्यावर भर देत आहोत, जेणे करून अॅपद्वारे रिझर्व्हेशन करण्यापूर्वी संबंधित जागा स्वच्छ असल्याची खात्री त्यांना करून घेता येईल. व्हेंडर डिस्काउंटव्यतिरिक्त, आम्ही नव्या ग्राहकांना त्यांच्या पहिल्या बुकिंगवर 40% व 50% पर्यंत इंट्रोडक्टरी डिस्काउंटही देत आहोत. आगामी काळाबद्दल आम्ही आशावादी आहोत!”


या सेवेचे फायदे केवळ ग्राहकांपुरते मर्यादित नाहीत. महामारीचे संकट अचानक कोसळल्यामुळे गेल्या दोन वर्षांत व्यवसायांचे बरेच नुकसान झाले आहे. वेलनेस्टा व्हेंडरना समाविष्ट करून घेत आहे आणि ऑनलाइन बुकिंग उपलब्ध करत आहे. यामुळे व्हेंडरसाठी उत्पन्नाच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. याव्यतिरिक्त, वेलनेस्टा या आउटलेटच्या अॅपॉइंटमेंटचे व्यवस्थापन, कुपन व्यवस्थापन, पेरोल व्यवस्थापन व इन्व्हेंटरी व्यवस्थापन अशा विविध कार्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी एक परिपूर्ण सॉफ्टवेअर सुविधा उपलब्ध करते.


वेलनेस्टाचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सार्थक सिंघई यांनी स्पष्ट केले, “गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये D2B जाहीर केल्यानंतर स्वाभाविकपणे आम्ही D2C सादर केले आहे. वेलनेस्टाबद्दल ग्राहकांमध्ये जागृती करणे आणि आमच्याद्वारे बुकिंग करण्यासाठी त्यांना उत्तेजन देणे, हे आमचे उद्दिष्ट आहे.”


बाजारातील स्थिती आता सुधारत आहे. लोक घराबाहेर पडू लागले आहेत आणि व्यवसायही पूर्वपदावर येत आहेत. लोकांनी पुरेशी काळजी घेणे आणि सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे. यासाठी वेलनेस्टा लोकांन मदत करते. लोकांना त्यांच्या अपॉइंटमेंटच्या वेळा आधीच बुक करता येऊ शकतात आणि गर्दी टाळता येऊ शकते.


वेलनेस्टाने आगामी तिमाहीमध्ये दिल्ली व बेंगळुरू येथे विस्तार करायचे नियोजन केले आहे.

bottom of page