किडनी व लिव्हरच्या आजारांवर आयुर्वेद प्रभावी - डॉ.वाघोले

मागील 20 वर्षांपासून आयुर्वेद क्षेत्रात काम करत असलेले डॉ.वाघोले ह्यांनी आधुनिक शास्त्रातील तपासण्यांच्या कसोटीवर हे सिद्ध केले आहे की आयुर्वेदाच्या सहाय्याने आपण किडनीच्या व लिव्हरच्या अनेक दुर्धर आजारांवर मात करू शकतो.


आयुर्वेदिक औषधाने किडनीचे आजार होतात असा एक गैरसमज अनेकांच्या मनात असतो, परंतु योग्य मार्गदर्शनाखाली बनवलेली, शास्त्रशुद्ध आयुर्वेदिक औषधे ही उत्तम प्रकारे किडनीचे अनेक असाध्य असे आजार बरे करताना दिसून येतात.

काविळी सारख्या आजारापासून अगदी लिव्हरच्या कॅन्सर सारख्या अनेक दुर्धर आजारांवर डॉ.वाघोले ह्यांनी त्यांच्या आयुर्वेदाच्या अभ्यासातून अनेक औषधे स्वतः तयार करून त्यांच्या रुग्णांवर वापरली आहेत. त्यातून असे दिसून आले आहे की अगदी लिव्हर ट्रान्सप्लांट ( लिव्हर बदलणे ) करण्याच्या अवस्थेत असलेल्या रुग्णांना पण आयुर्वेदामुळे उत्तम आरोग्यप्राप्ती झालेली आहे.


डायबेटीसमुळे किडनी निकामी होणे किंवा इतर कोणत्याही कारणाने किडनीत आजार होणे उदा. किडनी निकामी होणे, किडनीच्या गाळणीचे काम योग्यप्रकारे न होणे, किडनीला इन्फेक्शन होणे अश्या आजारांमध्ये सुद्धा आयुर्वेदिक औषधाने उत्तम परिणाम दिसतात.

औषधांच्या अतिसेवणामुळे लिव्हरमध्ये झालेले विषारी परिणाम, लिव्हरची कार्यक्षमता कमी होणे, पोटात पाणी होणे, लिव्हर सिरॉसिस, हिपाटोमेगॅली, पित्ताचे खडे होणे, फॅटी लिव्हर, हिपॅटायटीस, कोलेस्टेरॉल जास्त असणे, रक्ताचे प्रमाण कमी होणे अगदी पोर्टल हायपरटेन्शन मध्ये सुध्दा आयुर्वेदिक औषधे प्रभावी ठरत आहेत.

आणि हे सर्व आधुनिक शास्त्राच्या तपासण्यांनी सिध्द केले आहे.


त्यामुळे आयुर्वेदिक औषधांनी किडनी निकामी होते किंवा त्याचा लिव्हरवर विपरीत परिणाम होतो असा गैरसमज करून न घेता सर्वांनी आयुर्वेद व आधुनिक शास्त्र ह्यांचा योग्यप्रकारे योग्य डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने आपल्या आरोग्यासाठी उपयोग करून घ्यावा असा सल्ला डॉ.वाघोले आपल्या रुग्णांना देतात.