जागतिक अबॅकस चॅम्पियनशिपकरिता रुद्र प्रवीण सावरेची निवड
जागतिक अबॅकस चॅम्पियनशिपकरिता रुद्र प्रवीण सावरेची निवड


रुद्र सावरेने अबॅकस लेव्हल परीक्षेमध्ये मिळवले सर्वोत्कृष्ट ट्रॉफी


शालेय जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता अनेक शालेय तंत्रांचा वापर केला जातो त्यामधील अतिशय महत्त्वाचं गणितीय तंत्र म्हणजेच अबॅकस होय. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाकरीता अबॅकस आणि वैदिक गणित अतिशय महत्त्वाचे माध्यम ठरत आहे. शहरातील अबॅकस स्टडी सेंटर द्वारे अनेक विविध अबॅकस आणि वैदिक मॅथ लेव्हलच्या स्पर्धा घडवून आणून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास केला जातो. अशाच अबॅकस लेव्हल मध्ये विद्यार्थि रुद्र प्रवीण सावरने अबॅकस लेव्हलच्या परीक्षेमध्ये सर्वोत्कृष्ट अबॅकस स्पर्धक म्हणून सुवर्ण ट्रॉफी मिळवलेले आहे. शालेय अभ्यासक्रमातील, व्यवहारिक ज्ञानातील अनेक गणितीय प्रक्रिया काही क्षणांमध्ये अबॅकस द्वारे करू शकते असे रुद्र सावरेने सांगितले आहे.
अबॅकस लेव्हलच्या परीक्षेमध्ये अवघ्या सात मिनिटांमध्ये 60 प्रश्नांची उत्तरे अगदी बरोबर दिलेली असून ज्यामध्ये त्याचा सर्वोत्कृष्ट प्रथम स्पर्धक क्रमांक मिळवला आहे. रुद्र सावरेची जुलै 2022 मध्ये होणाऱ्या जागतिक स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये होणाऱ्या अबॅकस चॅम्पियनशिपसाठी सुद्धा त्याची निवड करण्यात आलेली आहे. रुद्र सावरेच्या यशामध्ये आई-वडिलांचे अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. सतत अभ्यास करणे, दिलेले होमवर्क पूर्ण करणे अगदी सुरुवातीपासून त्याने सातत्य ठेवलेले आहे. रुद्र सावरेने मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून स्वागत , अभिनंदन, पुढील वर्ल्ड अबॅकस चॅम्पियनशिप परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत होत , असे जिल्हा अबॅकस वितरक एस ए घोडके यांनी सांगितले आहे.


चौकट = विद्यार्थ्यांच्या मनातील गणिता विषयाची भीती दूर करण्यासाठी अब्याकस हे एक महत्त्वाचे माध्यम आहे