top of page
Writer's pictureTeam Stay Featured

सुवेधा देसाई - गावकर ह्यांनी मुलाखती मधून प्रेक्षकांची जिंकली मने





२१ मे शुक्रवारची मुलाखत नक्कीच संस्मरणीय ठरली , समोर होत्या सुवेधा देसाई- गावकर उर्फ दिल दोस्ती दुनियादारी मधली किंजल ,आणि सध्या सगळीकडे वायरल झालेल्या सासू सुनेच्या विडिओ मधील लोकप्रिय दुहेरी भूमिका करणारा चेहरा . नेहमीपेक्षा थोडी वेळ बदलली तरी त्यांचं हास्य शेवट पर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारं होतं .


प्रचेतन पोतदार ह्यांनी मुलाखतीचे सूत्रसंचालन करताना प्रेक्षकांनाही प्रश्नोत्तरा मध्ये सामील करून घेतले .


अनेक प्रश्नांची उत्तरे देताना त्यांचा हजरजबाबी पणा नक्कीच वाखाणण्याजोगा होता . कलाकार म्हणून समाज माध्यमांवर येताना येणाऱ्या अडचणी , अनेक प्रसंगांना तोंड देताना कशी मानसिकता असावी ह्यावर भरभरून बोलताना त्यांनी नव्या कलाकारांना उत्तम मार्गदर्शन केलं कोरोना काळात उत्तम काम करणाऱ्या पोलीस व डॉक्टर वर्गाचे आभार मानायला ही त्या विसरल्या नाहीत तसेच हक्काने काळजी घ्यायलाही सांगितले


शेवटच्या काही मिनिटांच्या साठी सूत्रसंचालनासाठी आलेल्या लेखिका शिद्दत ह्यांच्या रॅपिड फायर ला सुवेधा देसाई - गावकर ह्यांनी धमाल उत्तरे दिली



ज्यांना ही मुलाखत पाहता आली नाही ते खालील लिंक वर जावून मुलाखतीचा आनंद घेऊ शकतात


Part 1


Part 2



सुवेधा देसाई - गावकर ह्यांचे व्हिडीओ youtube वर पाहण्यासाठी इथे क्लिक करा


त्यांना इंस्टाग्राम वर follow करण्यासाठी इथे क्लिक करा


Comments


bottom of page