top of page

जे मनात आल ते बोलले...


Pic: Representative Pic from web


नमस्कार, मी गंगूताई यादव मी एक महिला बस कंडक्टर म्हणून गेले १२ वर्षे काम करते तस आता सवय झाली आहे पण सुरूवातीला मला फार त्रास होत असायचा नवरा लवकर गेला माझा त्यामुळे घरात दोन पोर त्यांच्या तोंडाकड बघत काम करायला सुरुवात केले आणी हळूहळू सवय झाली. मला तर कधी कधी सारख अस वाटत की हे माझ्याच नशीबी का वाढून ठेवले होत देव जाणे पण आलीया भोगाशी भोगाले पाहीजे अस म्हणत दिवस काढायचे बघा मी आहे ना जास्त शिकलेली नसले तरी मला आकडेमोड चांगले जमते म्हणून च मला यांच्या नंतर मला इथ रूजू करून घेतलं बघा चौथी पर्यंत शिकले ते एक प्रकारे बरच झाल ते कस आहे आमच्या गावी मुलींच्या शिक्षणास एवढ महत्त्व नाही बघा मुलगी १६ वर्षाची झाली की दिल लग्न लावून जणू तो एक सामाजमान्य बलात्कार च समजा की सावित्री बाईंनी इतकं आमच्या शिक्षणासाठी मेहनत घेतली पण या पुरूष प्रधान संस्कृतीत काही उपयोग नाही बघा त्यातल्या त्यात या खेडेगावात तर मुळीच नाही,


एवढंच काय तर आमच अस्तित्वच जणू या पुरूषामुळे आहे अस म्हणायचं झाल तरी चालतय बघा मी माझ च काय सांगत बसले तुम्हाला घरोघरी मातीच्या चुली माझ्या मेलीच काय नविन त्यात पण एक मला इथ एक सांगावं वाटत तुम्हाला ते महिला दिन का काय असतय ना

त्यावेळी माझा एवढ गाराण सरकार पर्यंत पोहचवा एवढीच माझी इच्छा आहे बघा ते म्हणजे अस कि मी गेली १२ वर्षे आगदी ईमानदारीत काम करते बघा पण असा एक बी दिस नाही की मी काम करत असताना मी बाथरूम ला रुमाल धरून नाहि गेले बघा कधी कधी तर उघड्यावर च जावं लागतय बघा आणि मासीक पाळी आली तर विचारू च नका बघा माझ च काय तर ज्या महिला तास न तास बस साठी वाट बघत असत्या त त्यांचा पण जरा विचार केला तर बर होईल त्याच बरोबर जरा पाण्याची पण सोय झाली तर उत्तम च आहे बघा या पुरूष प्रधान संस्कृती त माझ्या सारख्या तमाम महिला बस कंडक्टरला आणि तासनतास वाट बघत उभ्या असलेल्या महिलांना स्वच्छ सुलभ शौचालय भेटावं एवढीच या चौथी पास स्रीची इच्छा आहे बघा आणि सर्व ताईंना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते बघा .


काही चुकल असल तर माफ करा मी आपल अडाणी बाई जे मनात आल ते बोलले...

जय हिंद जय महाराष्ट्र...

Comments


bottom of page