काही मुलाखती मैफिली सारख्या असतात , एकदा सुरू झाली की मस्त रंगत जातात
आताची चिन्मयी सोबत ची मुलाखत ह्याच प्रकारात मोडणारी होती .
तिचा चित्रकलेचा प्रवास अगदी अनौपचारिक पद्धतीने उलगडला गेला
रंग आणि त्यावर आधारलेलं आयुष्य ह्यावर ती अगदी भरभरून बोलली त्याचे श्रेय गुरूंना आणि वडीलधाऱ्यांना द्यायला ती विसरली नाही
मानसीने सूर दिलेल्या गाण्यांना तिने कागदावर योग्य पद्धतीने उतरवून दाखविले तेही एकदा नाही तब्बल चार वेळा .
लेखिका व कवयित्री शिद्दत ने विचारलेल्या रॅपिड फायर च्या प्रश्नांची अगदी दिलखुलास उत्तरे दिली
प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद देत चिन्मयी च्या कलाकृती चे मनापासून कौतुक केलं
जे कोणी आज ही मुलाखत पाहू शकले नाहीत , त्यांनी ह्या लिंक वर जावून ही मुलाखत पाहावी
भाग 1
भाग 2
Commentaires