गेमिंग इंडस्ट्रीची व्याप्ती !!- आशिष राठी संचालक , अरेना ऍनिमेशन , टिळक रोड ,पुणे

तंत्रज्ञानाचे बदलणारे सुधारित रूप आणि मनोरंजनाचे बदलते व्यावसायिक स्वरूप यांच्या कोंदणात भारतीय गेमिंग इंडस्ट्री चा सुवर्णकाळ आपण सध्या अनुभवत आहोत. नव्वदीच्या दशकात किंबहुना उत्तरार्धात ध्रुवा इंटरएक्टिव, युबिसॉफ्ट, ईए स्पोर्ट्स, नॉलेज अ‍ॅडव्हेंचर, बॅश गेमिंग आणि इंडिया गेम्स यासारख्या कंपन्यांनी जेंव्हा गेम्स तयार करणे आणि त्यांचे प्रकाशन करण्यास सुरवात केली त्या काळापेक्षा भारतीय गेमिंग उद्योगाचे चित्र खरोखरच खूप पालटले आहे, परिपक्व झाले आहे. आज भारतामध्ये २५० हून अधिक गेमिंग कंपन्या आहेत. मोठ्या, लहान आणि नुकत्याच सुरु झालेल्या अशा सगळ्या कंपन्या अधिकाधिक आधुनिक गेम्स विकसित करण्याचा मानस घेऊन काम करत आहेत. नॅसकॉमनुसार दरमहा किमान दोन कंपन्या येतील आणि दर वर्षी सुमारे ३०% टक्क्यांची वाढ याप्रमाणे हा उद्योग आज सुमारे ६०००+ कोटी रुपये उलाढाल असलेला उद्योग आहे.


गेमिंग हा मनोरंजनाचा एक असा प्रकार मानला जातो ज्यात दर्शकत्व, सहभाग आणि परस्परसंवाद या तीही गोष्टी येतात. त्यात इ-स्पोर्ट्स, संगणक (पी सी) गेमिंग, मोबाईल गेमिंगचा समावेश आहे ज्याची भारतात अलिकडच्या काही वर्षांत भरभराट झाली आहे.गेम्स मधील वैविध्याच्या माध्यमातून हा उद्योग बऱ्याच अंगाने गतिशील होत आहे. गेम खेळणार्‍या लोकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि त्यासोबतच गेमिंग इंडस्ट्री लवकरच जगभरात वार्षिक १०० अब्ज डॉलर्सची कमाई करून अग्रेसर असेल.

या प्रक्रियेतून तरुण कौशल्य पुढे येत आहे आणि देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा विचार करीत आहे, जी कोणत्याही देशासाठी एक अभिमानास्पद